रूढी परंपरेचा आदर करून काही तरी सवलत द्यावीः नाईक
शिराळा येथील नागपंचमी उच्च न्यायालयाने निर्देश केलेल्या आणि वन्य जीव संरक्षण कायद्याच्या नियमानुसारच करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.
शिराळा येथील नागपंचमी कशी साजरी करावी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत, अप्पर जिल्हाधिकारी विजय पवार,निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, शिराळा तहसिलदार विजया यादव, वनअधिकारी एम.एस. भोसले,माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सामाजिक कार्यकर्ते पापा पाटील, प्रदीप पाटील शिराळा सरपंच गजानन सोनटक्के, ऍड. भगतसिंग नाईक यांची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले शिराळा येथील नागपंचमी ही रूढी परंपरेने सुरू झालेली आहे. याला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून ही नागपंचमी करण्यासाठी लोकांना प्रत्येक टप्यावर कायद्याचा बडगा लावू नये अशी आमची सर्व शिराळकराची भावना आहे. त्यामुळे या सणाकडे आमच्या भावनेतून जिल्हा प्रशासनाने पहावे.
यावर बोलताना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले शिराळा नागपंचमी मध्ये कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नये. उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये काही स्पष्ट सूचना आहेत या सूचनाप्रमाणेच लोकांनी हा सण साजरा करावा तसेच डॉल्बी व इतर वाद्याची आवाजही नियमानुसारच ठेवावेत असे त्यांनी सांगितले तसेच जर या कायद्यात विशेष बदल पाहिजे असतील तर न्यायालयाकडून तशी परवानगी आणावी आम्ही त्या परवानगीनुसार सुट देता येईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण जर कोण कायद्याचा भंग केला तर मात्र त्यावर कारवाई तातडीने करण्यात येईल.
नाईक म्हणाले या कायद्याबाबत आणि शिराळकराच्या भावना जाणून घेण्यासाठी अशीच एक बैठक शिराळय़ात घ्यावी. त्या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख व इतर विभागाचे अधिकारीही आले की त्याठिकाणी लोकांच्यासमोर प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकते. आणि अशी बैठक लवकरात लवकर व्हावी असे आवाहन त्यांनी केले.
सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
शुक्रवार, १९ जुलै, २०१३
नागपंचमी कायद्यानेच ः जिल्हाधिकारी
रूढी परंपरेचा आदर करून काही तरी सवलत द्यावीः नाईक
शिराळा येथील नागपंचमी उच्च न्यायालयाने निर्देश केलेल्या आणि वन्य जीव संरक्षण कायद्याच्या नियमानुसारच करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.
शिराळा येथील नागपंचमी कशी साजरी करावी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत, अप्पर जिल्हाधिकारी विजय पवार,निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, शिराळा तहसिलदार विजया यादव, वनअधिकारी एम.एस. भोसले,माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सामाजिक कार्यकर्ते पापा पाटील, प्रदीप पाटील शिराळा सरपंच गजानन सोनटक्के, ऍड. भगतसिंग नाईक यांची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले शिराळा येथील नागपंचमी ही रूढी परंपरेने सुरू झालेली आहे. याला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून ही नागपंचमी करण्यासाठी लोकांना प्रत्येक टप्यावर कायद्याचा बडगा लावू नये अशी आमची सर्व शिराळकराची भावना आहे. त्यामुळे या सणाकडे आमच्या भावनेतून जिल्हा प्रशासनाने पहावे.
यावर बोलताना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले शिराळा नागपंचमी मध्ये कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नये. उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये काही स्पष्ट सूचना आहेत या सूचनाप्रमाणेच लोकांनी हा सण साजरा करावा तसेच डॉल्बी व इतर वाद्याची आवाजही नियमानुसारच ठेवावेत असे त्यांनी सांगितले तसेच जर या कायद्यात विशेष बदल पाहिजे असतील तर न्यायालयाकडून तशी परवानगी आणावी आम्ही त्या परवानगीनुसार सुट देता येईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण जर कोण कायद्याचा भंग केला तर मात्र त्यावर कारवाई तातडीने करण्यात येईल.
नाईक म्हणाले या कायद्याबाबत आणि शिराळकराच्या भावना जाणून घेण्यासाठी अशीच एक बैठक शिराळय़ात घ्यावी. त्या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख व इतर विभागाचे अधिकारीही आले की त्याठिकाणी लोकांच्यासमोर प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकते. आणि अशी बैठक लवकरात लवकर व्हावी असे आवाहन त्यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा