मिरवणुकीत मद्यधुंद शेतकऱयांचा प्रताप बैलांच्या पायात लावले फटाके नागरिकांची धावाधाव
वर्षभर शेतात राबणाऱया बैलांना ज्या दिवशी विश्रांती द्यायची, त्या बेंदराच्या दिवशी शहरातील काही मद्यधुंद शेतकऱयांनी मिरवणुकीच्या नावाखाली बैलांच्या शेपटांना फटाके बांधून आणि त्यांना टोकदार वस्तूने टोचून अनन्वित छळ केला. रविवारी सायंकाळी शहरातील लक्ष्मी मार्केटच्या गजबजलेल्या परिसरात फटाक्यांच्या आवाजाने बैल उधळल्याने नागरिकांची धावाधाव झाली. या धावपळीत काही नागरिक रस्त्यावर पडून जखमीही झाले. नदीवेस भागातही असाच प्रकार रात्री उशीरापर्यंत सुरू होता. प्राणीमित्रांनी याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे.
रविवारी बेंदूर सण होता. वर्षभर शेतकऱयांसाठी राबणाऱया या मूक प्राण्याला एक दिवस विश्रांती द्यावी. या हेतूने हा सण शेतकरी बांधव साजरा करतात. या दिवशी बैलांना सजविण्यात येते. त्यांची पूजा करण्यात येते. या दिवशी त्यांच्याकडून कोणतेही काम करून न घेता त्यांना पूर्ण विश्रांती देण्यात येते. मात्र, बेंदराचा हे महत्त्व न समजलेल्या मिरजेतील काही मद्यधुंद शेतकऱयांनी रविवारी सायंकाळी बैल मिरवणुकीच्या नावाखाली बैलांचा अनन्वित छळ केला.
रविवारी सायंकाळी शहरातील काही शेतकऱयांनी बैलजोडय़ांच्या मिरवणुका काढल्या होत्या. सवाद्य मिरवणुकीने सजविलेल्या बैलजोडय़ा शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आल्या. यापैकी काही शेतकऱयांनी मात्र बैलांच्या शेपटांना फटाके लावत त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. तर, त्यांना तीक्ष्ण आणि टोकदार वस्तुंनी टोचून बुजविण्याचा प्रयत्न केले. सुमारे तीन-चार तास हे प्रकार सुरू होते.
यापैकी एक बैलजोडी लक्ष्मी मार्केट जवळ आली असता, फटाक्यांच्या आवाजने बुजून उधळली गेली. त्यामुळे गजबलेल्या या परिसरात एकच धावपळ उडाली. पावसाने चिखलमय झालेल्या या रस्त्यात काही नागरिक खाली पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या.
नदीवेस भागात निघालेल्या मिरवणुकांतही वेगवेगळय़ा हत्त्यारांनी बैलांना बुजविण्याचे प्रकार घडले. या भागात रात्री उशीरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. याबाबत प्राणीमित्र संघटनांनी शेतकऱयांना समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र, मद्यधुंद अवस्थेत बेभान झालेल्या शेतकऱयांनी त्यांना जुमानले नाही. ज्या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची त्याच दिवशी त्यांचा अनन्वित छळ केल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
बेंदरादिवशी झालेल्या या प्रकाराबाबत पोलिसात तक्रारी देण्याच्या हालचाली प्राणीमित्र संघटनांनी केल्या आहेत. पिपल्स फॉर ऍनिमल संघटनेचे अशोक लकडे यांनी याबाबत न्यायालयातही धाव घेणार असल्याचे सांगितले.
सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
रविवार, २१ जुलै, २०१३
मिरजेत बेंदरादिवशीच बैलाचा छळ

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा