सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
शुक्रवार, १९ जुलै, २०१३
मदनभाऊ आज सांगलीत ः जय्यत तयारी विजय बंगल्यावर शुभेच्छा स्वीकारणार
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश व त्यानंतर उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री मदन पाटील यांचे शनिवारी 20 जुलैला सांगलीत आगमन होत असून मदन पाटील यांचे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणुकीला फाटा देण्यात आला असला तरी मदन पाटील हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी त्यांच्या विजय बंगल्यावर सकाळपासूनच थांबणार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत मदन पाटील यांच्यासह पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम व केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचा पालिकेवर पुन्हा एकदा झेंडा फडकाविला.त्यानंतर लगेचच मदन पाटील यांची काँग्रेस पक्षाने राज्याच्या उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून मदन पाटील पर्यायाने काँग्रेस पक्षाला सांगलीत ताकद देण्याचे काम केले आहे. दोनच दिवसापूर्वी या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मदन पाटील यांच्या आगमनाबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर संपली असून मदन पाटील यांचे शनिवारी सांगलीत आगमन होणार आहे.
मदन पाटील यांच्या सुचनेनुसार मिरवणूक काढण्यात येणार नाही. तथापि, लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते विजय बंगल्यावर सकाळपासून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मदन पाटील यांना मिळालेले महामंडळ हे कॅबीनेट दर्जाचे असून त्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय व लाल दिव्याची गाडी आहे. थेट मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी संलग्न असणाऱया या महामंडळाच्या अख्यत्यारित राज्यातील 14 जिल्हय़ातील विकासकामांचा समावेश व सुमारे 100 कोटीचे बजेट असणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा