सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३
जत साखर कारखान्याचे धुराडे पेटणार!
@नोंव्हेंबरपासून गाळप, तीन लाख गळिताचे उददीष्ट
@दुरूस्तीचे काम अंतिम टप्यात
@स्थानिकांनाच रोजगाराची संधी,कर्मचारी भरती सुरू
@ किरण जाधव / जत
जत तालुकयाच्या विकासाचा मानबिंदू ठरलेला येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे धुराडे तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा पेटणार आहे. अवसायनात गेलेला कारखाना इस्लामपूरच्या राजारामबापू युनिटने खरेदी केल्यानंतर या कारखान्याच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्यात आणले असून नोंव्हेबरपासून कारखान्यातून साखर गाळपाचे काम सुरू होणार आहे. यंदा तीन लाख टन साखर गाळपाचे उददीष्ट कारखान्याने घेतले आहे. यामुळे जतेच्या विकासाला गती मिळणार आहे.
जत तालुकयाच्या विकासात आणि राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱया जतच्या साखर कारखान्याने स्थापनेपासून अनेक चढउतार पाहीले आहेत. कधी या कारखान्याने गोड साखरेचे गाळप केले तर कधी राजकीय कडवटपणाही बाहेर पाडला. यामुळे जत शुगरच्या धुराडय़ातून ज्या विकासाच्या अपेक्षा आजवर तालुक्यातील जनतेला होत्या, त्या पूर्ण होवू शकल्या नाहीत. जत कारखान्याने जतला काय दिले तर याचे उत्तर सभासदांनाही मिळणार नाही इतका राजकीय चिखलात व कुरघोडीत तो अडकला होता.
वास्तविक सभासदांच्या मालकीचा असणारा कारखाना का बंद पडला, कर्जाचा बोजा का वाढला, तो अवसायानात का गेला, प्रशासकांच्या काळात काय झाले, त्याची विक्री का झाली याचे रामायण महाभारात तालुकावासियांनी अनुभवले आहे. त्यामुळे या शिळय़ा प्रश्नांच्या कडीला उत आणण्यापेक्षा आता तो कोणी का असेना नव्या दमाने सुरू करतोय ही बाब तालुक्याच्या विकासाच्या व हिताच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे.
खरेतर ज्या मातीत कुसळंसुध्दा उगवत नव्हती अशा फोंडय़ा माळावर साखर कारखाना उभा राहीला हे त्याकाळच्या दृष्टीने महत्वाचे होतेच, पण आजच्या घडीला तो आणखीन चांगला आहे. कारण आता जतेच्या शिवारात कृष्णेचे पाणी येण्याची वाट बऱयापैकी मोकळी झाली आहे. शिवाय या तालुक्यातील शेतकरी नेहमीच सकारात्मक विचारांनी शेती कसतोय व उसासारख्या पीकाला आता हुकमी दर मिळत असल्याने दुष्काळी पटटय़ातील शेतकऱयांच्या आर्थिक समृध्दीला बळ मिळणार आहे.
यातील महत्वाची बाब म्हणजे मागे हाच कारखाना आर्थिक कोंडीत अडकल्यानंतर तो राजारामबापू कारखान्याला करारांनी चालविण्यास दिला होता. सन 2006ः 2007 च्या सालात त्यांनी अवघ्या 29 दिवसात बंद कारखान्याची मशिनिरी सुरू करून हंगामही यशस्वी केला होता. त्यावेळेस 3 लाख 84 हजार इतके गाळप केले होते. तर सन 2007 ः 2008 ला एक लाख 61 हजार या कारखान्यातून गाळप झाले होते. त्यानंतर राजकीय कुरघोडीत कारखाना बंद राहीला. या कारखान्यावर प्रशासक आणण्यात आले होते. वर्षभरापूर्वी मात्र हा कारखाना राजारामबापू युनिटने खरेदी केला. तेंव्हापासून कारखान्याच्या कामकाजाला नव्याने गती मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर उदय़ोगात राजारामबापू कारखान्याचे नाव आघाडीवर आहे. शिवाय ज्या पध्दतीने इस्लामपूरला कारखान्याच्या माध्यमातून विकास साधण्यात आला. त्याचपध्दतीने जतेचा विकास साधण्याचा मानस या युनीटने केला आहे.
त्यामुळे मागच्या सहा महीन्यांपासून कारखाना परिसराचे रूपडे बदलण्याची प्रक्रीया गतीने सुरू आहे. आजवर कारखाना इमारतीचे नूतनीकरण, बॉयलर नूतनीकरण करण्यात आले आहे. मशिनरी, सिव्हील व इंजिनीअरींगची कामेही अंतीम टप्यात आली आहेत. विदय़ुतीकरण पूर्ण झाले असून, कर्मचाऱयांच्या ईमारती सुसज्ज व अदय़ायावत, रस्त्यांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 300 कर्मचारी कार्यरत आहेत.
कर्मचाऱयांच्या मुलाखती पूर्ण
गत आठवडय़ात या कारखान्यासाठी लागणाऱया तंत्रज्ञ कर्मचाऱयांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यांची भरती प्रक्रीयाही सुरू करण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाने स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले आहे. शिवाय पूर्वी जे कामगार येथे होते, त्यांनाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे येथील अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
तीन लाख गाळपाचे उददीष्ट
2500 क्षमतेच्या जत शुगरचे गाळप नोंव्हेंबरपासून होत आहे. यंदा तीन लाख गाळपाचे उददीष्ट घेण्यात आले आहे. तर सध्यस्थितीत जत तालुक्यात जवळपास तीन हजार एकरावर उस लागवड असून, यात वाढ होण्याच्या दृष्टीने कारखान्याने कृती आराखडा तयार केला आहे. ठिबक तंत्रज्ञानावर उस शेती विकसीत करण्याचे महत्वपूर्ण उददीष्टही हाती घेण्यात आले आहे. भविष्यात को जनरेशन व डिस्ट्रीलरी प्रकल्पही येथे उभे राहणार आहेत. त्याचबरोबर सध्या कारखाना परिसरात तीन हजार वृक्षलागवड करण्यात येत आहे.
एकुणच जतेच्या विकासाला गती देणारा एक मोठा प्रकल्प लवकरच नव्याने सुरू होत आहे. यामुळे निश्चितच जतेच्या औदय़ागिक, शेती, उदय़ोगाला गती मिळणार हे मात्र निश्चित..!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा