
जयंतरावांनी दिले पराभवाने न खचता पुन्हा लढण्याचे संकेत
सांगलीला पूर येतो आणि ओसरतोही. आमच्या बाजुने पुन्हा भविष्यात पूर येईल असे सांगत पराभवाने खचून न जाता राष्ट्रवादी सांगलीत पुन्हा लढाईला उतरेल असे संकेत ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.
सांगलीत राष्ट्रवादीला 15 टक्के मते कमी पडतील असा अंदाज निवडणुकी पूर्वीच आला होता. त्यामुळे मी जास्त जोरात प्रचार केला. मात्र, आमचे महापौरच आमच्या बाजुने बोलण्यासाठी नसल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यात आम्हाला यश आले नाही, असेही ते म्हणाले.
प्रतीक पाटील आणि काँग्रेसवर टीका
जयंतरावांनी आपल्या मुलाखतीस केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. दहा वर्षे काँग्रेसकडे महापालिकेची सत्ता असताना त्यांनी विकासाचा विचारही केला नव्हता. म्हणून सांगलीकर जनतेने आम्हाला सत्ता दिली होती. आम्ही पाच वर्षात 604 कोटींची कामे मंजूर करून आणली आणि 303 कोटी रूपये खर्च केले. पण, त्याचा गवगवा करण्यास महापौर आमच्या बरोबर नव्हते, असे ते म्हणाले.
प्रतीक पाटील लोकसभेला फार कमी मताधिक्क्याने विजयी झाले. त्यामुळे ते आमच्यावर चिडले आहेत. त्यांच्या विरोधात बंडखोरी करणारे अजितराव घोरपडे त्यावेळी काँग्रेसमध्येच होते. मी हातकणंगले, कोल्हापूरमध्ये गुंतलो होतो आणि आबांच्या मतदार संघात प्रतीक यांनाच मताधिक्य असतानाही ते विनाकारण राष्ट्रवादीच्या नावाने शेख मारत आहेत. प्रत्येकाच काम बोलत त्यांच्या कामावर जनतेन कमी अधिक विश्वास ठेवला, असा टोलाही जयंतरावांनी मारला.
लोकसभा - पवारांचा निर्णय अंतिम
येतय़ा लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का? या प्रश्नावर लोकसभा अजून फार लांब आहे. याबाबतीत आताच औत्सुक्य दाखवण न दाखवण योग्य नाही. मात्र, शरद पवार जो निर्णय देतील तो मला मान्य असेल असे जयंतराव म्हणाले.
आपल्या या मुलाखतीत महाआघाडीत केलेल्या विकास कामांचा त्यांनी पुनरूच्चार केला. आज जरी आम्ही आमची काम दाखवू शकतो नाही तरी 67 वरून 102 एमएलटी पाणी शहराला पुरवले, कनेक्शन दुप्पट केल, 900 कि.मी. पर्यंत पाईन लाईन बसवले, 120 कि.मी. नवी लाईनच काम सुरू आहे. दोन महिन्यात 78 आणि 38 एमएलटीचे दोन प्लँट सुरू होतील. अंडरग्राऊंड योजनेला 200 कोटी आले असून त्यानंतर डास मुक्ती होईल, 23 कोटींची रस्त्यांची कामे होतील, येत्या तीन वर्षात सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण, सांगली-पेठ मार्ग महामार्गाला जोडणे, अंडरग्राऊंड ड्रेनेज ही काम पूर्ण होतील. सिद्धेवाडी एमआयडडीसीचे सहा टप्पे पूर्ण झाले असून भूमी संपादन अंतिम टप्प्यात आहे. तिथे मोठे उद्योग येतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
- 15 टक्के मते घटण्याच्या अपेक्षेनेच जोरात प्रचार.
- शहरात राष्ट्रवादी नव्हता, पराभवानंतरही सर्व वॉर्डात आमची ताकद वाढली आहे.
- पक्षातील कोणीही माझा गेम केला नाही.
- शहरात राष्ट्रवादीने पुन्हा पूर येईल.
- काँग्रेसने विकासाचा विचारच न केल्याने आम्हाला सत्ता मिळाली होती.
- महापौरच फुटल्याने आमच्या कामाचा प्रचार झाला नाही.
- प्रतीक पाटील यांना फार कमी मताधिक्य असल्याने ते आमच्यावर चिडून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा