
चांदोली धरण परिसरातील सुरू असणाऱया मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या चार वक्राकार दरवाज्याच्या सांडव्यावरून आज दु.12.30 वाजता पाणी बाहेर पडले. राज्यातील मातीचे सर्वात मोठे असणाऱया धरणातून यंदा पहिल्यांदाच सांडव्यावरून पाणी बाहेर पडले आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 34.40.टी.एम.सी.ची.आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी आनंदीत आहे. तर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 83 मिलीमीटर पावसासह एकूण 1514 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा असून धरणाची पाणी पातळी 621.05 मिटर आहे. 83.53 टक्के धरण भरले आहे. गतवर्षी 1 ऑगस्ट ला सांडव्यावरून पाणी बाहेर पडले. धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून व विजनिर्मितीकडून 5805 विसर्ग सुरू आहे. बाहेर पडलेल्या पाण्याचे पुजन कार्यकारी अभियंता अजय इनामदार, उपकार्यकारी अभियंता अमोल निकम, व्ही.एम.पाटील, के.बी.चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. धरणाचे चार वक्राकार दरवाजे 0.60 मीटरने उचलणेत आहेत.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील डोंगरदऱया हिरव्यागर्द वनराईने नटलेल्या आहेत. गार गार वारा आणि मुसळधार पाऊस पर्यटकांना आकर्षित करीत आहे. चांदोली धरण परिसर हा पावसाचा आगर म्हणून ओळखला जातो येथील वार्षिक पर्जन्यमान सरासरी चार ते साडेचार हजार मिलीमीटर असते. परंतु चालूवषीं एक जून पासून आजअखेर फक्त 1514 मिलीमिटर एवढय़ाच पावसाची नोंद झाली आहे. अद्याप या परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे. 2 जून पासून या परिसरात पाऊस सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तर मुसळधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे या परिसरात अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी या भागाचा विद्युत पुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. तर शासकीय यंत्रणेने सतर्क असणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, भुकंप, हिंस्त्र प्राण्याची भिती, अतिदुर्गम व डोंगरदऱयाचा भाग असलेने नेहमीच येथील लोकाना भितीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. अशातच विद्युत पुरवठा खंडीत होण्यामुळे लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व विभागाच्या यंत्रणेने सतर्क असणे गरजेचे आहे.
सध्या धरणातील पाणी पातळी 621.05 मिटर असून पाणीसाठा 813.753 दशलक्ष घनमीटर झाला म्हणजेच धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी 83.53 अशी आहे. गतवर्षी 1 ऑगस्टला धरणाच्या सांडव्यावरून पाणी बाहेर पडले होते. यंदा तब्बल 10 दिवस अगोदरच सांडव्यावरून पाणी बाहेर पडले आहे. धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून 4300 व विजनिर्मितीकडून 1505 असा एकूण 5805 विसर्ग सुरू आहे. संततधार पाऊस व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वारणानदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. नदीकाठावरील ऊस व भात पिके पाण्याखाली जात आहेत. नदीकाठावरील गावाना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा