आयर्विन पातळी 20 फुटावर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून यामुळे धरणांच्या पाणीपातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना आणि वारणेचा विसर्ग दुप्पट केला असून सध्या दोन्ही धरणामधून 39 हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे.
यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्येही वाढ होत असून सांगलीत आयर्विन पुलाची पातळी 20 फुटावर गेली आहे. तर शिराळय़ातील तीन पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हरिपूर येथे कृष्णा-वारणा संगमावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे.
धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे. रविवारी सकाळपर्यंत कोयनेत 142 मिमी पावसाची नोंद झाली, तर दिवसभर 37 मिमी पाऊस पडला. वारणा धरण परिसरामध्येही पावसाचा जोर सुरूच आहे. सकाळपर्यंत तब्बल 69 मिमी तर दिवभर 16 मिमी पाऊस पडला. धोम, कण्हेर या धरण क्षेत्रातही पावसाचा जोर सुरूच आहे.
या पावसामुळे कोयनेत 86.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे येथून 24 हजार 818 इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणेत 20.36 टीएमसी पाणीसाठा झाला असून येथून 14 हजार 227 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना कराड 16.10, बहे 9.5, ताकारी 23.10, भिलवडी 24.6, आणि आयर्विन 19.9 इतकी पातळी सायंकाळपर्यंत झाली होती. पावसाचा जोर असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शिराळय़ामध्येही पावसाचा जोर असून यामुळे काखे-मांगले, मांगले-सावर्डे, आणि कोकरूड-रेठरे हे तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हय़ामध्ये पावसाची रिमझिम सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत इस्लामपूर 14, पलूस चार, शिराळा 25, मिरज आठ, खानापूर पाच, आटपाडी तीन, जत दहा आणि कडेगाव दहा मिमी पावसाची नोंद झाली.
सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
रविवार, २१ जुलै, २०१३
कोयना-वारणेचा विसर्ग दुप्पट
आयर्विन पातळी 20 फुटावर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून यामुळे धरणांच्या पाणीपातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना आणि वारणेचा विसर्ग दुप्पट केला असून सध्या दोन्ही धरणामधून 39 हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे.
यामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्येही वाढ होत असून सांगलीत आयर्विन पुलाची पातळी 20 फुटावर गेली आहे. तर शिराळय़ातील तीन पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हरिपूर येथे कृष्णा-वारणा संगमावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे.
धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे. रविवारी सकाळपर्यंत कोयनेत 142 मिमी पावसाची नोंद झाली, तर दिवसभर 37 मिमी पाऊस पडला. वारणा धरण परिसरामध्येही पावसाचा जोर सुरूच आहे. सकाळपर्यंत तब्बल 69 मिमी तर दिवभर 16 मिमी पाऊस पडला. धोम, कण्हेर या धरण क्षेत्रातही पावसाचा जोर सुरूच आहे.
या पावसामुळे कोयनेत 86.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे येथून 24 हजार 818 इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वारणेत 20.36 टीएमसी पाणीसाठा झाला असून येथून 14 हजार 227 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कोयना कराड 16.10, बहे 9.5, ताकारी 23.10, भिलवडी 24.6, आणि आयर्विन 19.9 इतकी पातळी सायंकाळपर्यंत झाली होती. पावसाचा जोर असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शिराळय़ामध्येही पावसाचा जोर असून यामुळे काखे-मांगले, मांगले-सावर्डे, आणि कोकरूड-रेठरे हे तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हय़ामध्ये पावसाची रिमझिम सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत इस्लामपूर 14, पलूस चार, शिराळा 25, मिरज आठ, खानापूर पाच, आटपाडी तीन, जत दहा आणि कडेगाव दहा मिमी पावसाची नोंद झाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा