सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
शुक्रवार, १९ जुलै, २०१३
आज वारणेचे दरवाजे उघडणार
कोयनेतून सलग तिसऱया दिवशी दरवाजे खुले, जिल्हय़ात पावसांच्या आगमनाने कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी वाढू लागले,
वारणा आणि कोयना या दोन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसांमुळे धरणांची पाणीपातळी आणि साठय़ात जोरदार वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरणातून तीन दिवसापुर्वी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून सेंकदाला 11 हजार 383 क्युसेस पाणी सोडले जाते आता वारणा धरणातूनही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शनिवारी सकाळी दहा नंतर धरणातील पाणीपातळी पाहून हे दरवाजे किती उघडायचे हे ठरविण्यात येणार आहे. वारणा धरणात सध्या 28.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण जवळपास 82 टक्के भरले आहे. त्यामुळे हे पाणी सोडण्यात येणार आहे.
कोयना आणि वारणा या दोन्ही धरणातील पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम सांगली शहरावर होतो. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णेचा संगम झाल्यानंतर कृष्णेची पाणीपातळी झपाटय़ाने वाढते तसेच हे पाणी मागच्या बाजूला दाबले जाते आणि आयर्विन पुलाजवळ कृष्णाची पाणीपातळी वाढत जाते. कोयनेतून सध्या 11 हजार 383 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दोन दिवसांतच पाच प़टाने वाढून 14 फूटावर स्थिर झाली आहे. वारणा धरणांतील पाणी सोडण्यात आल्यानंतर ही पाणीपातळी वाढतच जाते.
कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत कोयना येथे 49, महाबळेश्वर येथे 36, आणि नवजा येथे 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण धरणांच्या क्षेत्रात 27 हजार 48 क्यूसेस पाणी येते आणि त्यातील 11 हजार 383 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वाढतच आहे. शुक्रवारी कोयना धरणात एकूण 82.72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर वारणा धरणात 28.03 इतका पाणीसाठा झाला आहे तर धोम धरणात 8.03 आणि कण्हेर धरणात 6.96 इतका पाणीसाठा झाला आहे.
या धरणांतील पाणीपातळी वाढत असताना कृष्णा आणि वारणेचीही पाणीपातळी वाढत चालली आहे. बहे याठिकाणी कृष्णेची पाणीपातळी आठ फूट एक इंच इतकी झाली आहे तर ताकारी याठिकाणी ही पाणीपातळी 19 फूट तीन इंच झाली आहे. भिलवडीत 20 फूट नऊ इंच इतकी आहे तर आयर्विन पूलावर ती 14 फूट झाली आहे आणि अंकली येथे 19 फूट पाणीपातळी आहे. आयर्विन येथे 18 हजार 62 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पण तोच अंकलीमध्ये मात्र 41 हजार 980 इतका होत आहे.
जिल्हय़ात गुरूवारी पावसांने आपली मान टाकली होती पण शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे.त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. या पावसांच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. पण सांगली शहरात मात्र या पावसांमुळे रस्त्यावर चालणे अवघड बनले आहे. इतकी वाईट अवस्था शहरातील प्रमुख रस्त्याची झाली आहे. गुंठेवारीत तर चिखलातूनच मार्ग काढत जावे लागत आहे.
गुरूवारी जिल्हय़ात झालेला पाऊस असा इस्लामपूर चार मिमी, पलूस एक, तासगाव एक, सांगली दोन, शिराळा येथे 13 मिरज येथे तीन, विटा येथे तीन, आटपाडीत शुन्य, कवठेमहांकाळ येथे एक, जत येथे दोन आणि कडेगाव येथे सात मिमी पावसांची नोंद झाली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा