बुधवार, १७ जुलै, २०१३

आषाढीनंतर कांदा रडवणार, भाव 3 हजारांवर

दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यांसह परदेशातही कांद्याची मागणी वाढली आहे. कर्नाटकमधील कांदा बाजारात विक्रीला येण्यासाठी उशीर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल कमाल 2 हजार सहाशे तर किमान अकराशे रुपये भाव मिळाला. लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, चांदवड, नांदगाव बाजार समितीत जास्तीत जास्त 2500, तर सरासरी 2300 ते 2400 रुपये भाव होता. दक्षिणेतील कांदा सप्टेंबर महिन्यातील मध्यापर्यंत बाजारात येणार आहे. तोपर्यंत 3 हजार रुपयांपर्यंत दर जाण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तवली आहे, तर देशातील प्रमुख शहरांत किरकोळ बाजारात नाशिकला 30, मुंबई 35 ते 40, हैदराबाद 35 ते 40, पटणा 30 ते 35 , कोलकाता 35 ते 40 रुपये प्रति किलो दर आहे. गुजरात राज्यात कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा भार महाराष्ट्रावर पडला आहे. तसेच कर्नाटकमधील कांदा उत्पादन बाजार समितीत येण्यासाठी अजून सुमारे दीड महिना अवकाश आहे.कांद्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दर वाढत आहेत. यंदा पाणीटंचाई असल्याने कांदा उत्पादनात घट झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा