19 जुलै रोजी पंढरपुरात यात्रा भरणार आहे. र्शीविठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस व मंदिर विश्वस्त मंडळातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेसाठी लाकडी संरक्षक कठडे, नगर-औरंगाबाद महामार्गावरील तिरंगा चौक ते कामगार चौकदरम्यानची वाहतूक एमआयडीसीमार्गे वळविणे, पोस्टर लावण्यावर बंदी आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी साडेसहा लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून मुख दर्शनासाठी दिंडीसाठीच्या प्रवेशद्वाराजवळ व मंदिराच्या दर्शनी भागात दोन दूरचित्रवाणी संच ठेवून तेथे मूर्तीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शिवाय 300 स्वयंसेवक मंदिर परिसरात गर्दीचे व्यवस्थापन करणार आहेत. लगतच्या पाच गावांतील ग्रामपंचायतीचे प्रत्येकी पाच कर्मचारी भाविकांच्या मदतीसाठी राहतील. कामगार चौक व तिरंगा चौकातील अब्बास पेट्राल पंपामोरील मैदानावर भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था राहणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भरणार्या यात्रेत शहराच्या विविध भागांसह ढोरेगाव, प्रवरासंगम, लांझी, शिवराई, तुर्काबाद, दहेगाव बंगला, जिकठाण, पिंपरखेडा, रांजणगाव शेणपुंजी, करोडी, वाळूज, बजाजनगर, जोगेश्वरी, नायगाव, पाटोदा परिसरातून निघालेल्या दिंड्या मोठय़ा प्रमाणावर दाखल होतात. यंदा यात वाढ होणार असून त्यांची संख्या दोनशेच्या वर जाणार असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
लहान मुलांसाठी विविध खेळणी दाखल
लहान मुलांसाठी खेळणी, झोपाळे, रहाटपाळणे, मौत का कुवाँ, फिरते सिनेमागृह यात्रेनिमित्ताने दाखल होत आहेत. एक दिवस भरणारी ही यात्रा परिसरातील भाविकांचे र्शद्धास्थान असल्याने यात्रेला मोठे महत्त्व आहे.
10 सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर
यंदा भाविकांची गर्दी वाढणार असल्याची शक्यता पोलिस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मंदिरालगतच्या पोलिस कंट्रोल रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची ऑपरेटिंग व्यवस्था करण्यात आली आहे. येथून गर्दीवर लक्ष ठेवले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा