सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
शुक्रवार, १९ जुलै, २०१३
छावण्या बंदच्या तोंडी सूचना
31 जुलैच्या डेडलाईनने शेतकरी हबकला ः चाऱयाची पंचाईत
@ आटपाडी / प्रतिनिधी
राज्य शासनाने चारा छावण्या व टँकरला 31 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली असली तरी ही मुदत आता संपुष्टात येत आहे. त्यातच प्रशासकीय पातळीवरून छावण्या बंद करण्याबाबत तोंडी सुचना सुरू झाल्याने पशुपालक हबकला आहे. आटपाडी तालुका आजही पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना छावण्या बंद झाल्या तर चारा कोठून उपलब्ध करायचा? असा सवाल करत शेतकऱयांनी हतबलता व्यक्त केली आहे.
आटपाडीसह राज्यात दोन वर्षापासून तीव्र दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शासनाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी दुष्काळग्रस्तांना टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा आणि पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्याचा निर्णय घेतला. चारा छावण्या सुरू झाल्यानंतर किमान पशुधन जगवण्याची सोय झाली. आज आटपाडी तालुक्याचा विचार करता या छावण्या सुरू होऊन वर्ष लोटत आहे. अद्यापही पावसाचे चित्र स्पष्ट नसल्याने चाऱयाची कोठेही उपलब्धता अशक्यच आहे.
शासनाने प्रथम दुष्काळी उपाययोजनातील छावणी व टँकर जून महिन्याअखेर सुरू ठेवण्याचे आदेश जारी केला. त्यानंतर दुष्काळाचे चित्र बदलले नसल्याने पुन्हा नव्याने ही मदत जुलै अखेर वाढवली. सध्या ही मुदतदेखील संपुष्टात येत असल्याने छावणी चालकांसह पशुपालकदेखील हैराण बनला आहे. मुळात सद्या पाऊस नसल्याने चाऱयाची उपलब्धता अशक्य आहे. त्यामुळे छावण्या बंद झाल्यातर पशुधन कसे जगवायचे? या समस्येत पशुपालक हवालदिल आहे.
शासनाच्या छावण्या व टँकरच्या मुदतीचा 31 जुलैला शेवट होत असल्याने महसुल विभागातील काही मंडळींनी संबंधित चालकांना तोंडी सुचना करत या छावण्या बंद करायच्या असल्याचे फर्मान सोडले आहे. 31 जुलैला छावण्या बंद करा, असे सांगत छावणीशी निगडीत महसुलच्या अधिकाऱयांनी आपले कर्तव्य बजावण्यास सुरूवात केली आहे. तर हे ऐकुन पशुपालक हवालदिल बनला आहे.
अधिवेशनात निर्णय व्हावा
शासनाने छावणी व टँकरची गरज पाहून या मदतीला मुदतवाढ देण्याची मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱयांनी केली आहे.
सध्या पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱयाची उपलब्धता नसल्याने आटपाडीसह दुष्काळी भागातील या सुविधा सुरूच ठेवाव्यात, अशी मागणी करत अनेकांनी या प्रश्नावर सध्याच्या अधिवेशनात निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली
आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा