सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
रविवार, २८ जुलै, २०१३
दम टाकला... लाभक्षेत्रातील उघडीपीमुळे विसर्ग कमी केला ,कृष्णा आणि वारणा आजपासून उतरणार ,कोयनेचा विसर्ग 46हजार तर वारणेचा चौदा हजार क्युसेक्स,सांगलीतील कर्नाळ रस्ता मात्र अजूनही बंद, बहे,ताकारी,भिलवडी येथे पातळी उतरली
कोयना, वारणा, कण्हेर, आणि धोम धरणांतून लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने रविवारी पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.त्यामुळे कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांना आलेला पूर आता उतरण्यास प्रारंभ झाला आहे. असून आयर्विनजवळ सोमवारी ती 35 फुटावर जाणार आणि त्यानंतर ही पाणीपातळी झपाटय़ाने उतरणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागातून देण्यात आली. पाऊस थांबल्यामुळे पुराची भीती ही संपली आहे. या पुरामुळे शहरातील कर्नाळ रस्ता अजूनही बंद आहे.सांगलीतील सूर्यवंशीनगर, इनामदार प्लॉट येथे पाणी आहे. कोयना धरणाचे दरवाजे बारा फुटानेच उचलले असून येथून विसर्ग कमी झाला आहे. ता46520 हजारवर करण्यात आला आहे. जिल्हय़ात बहे, ताकारी आणि भिलवडी येथे पाणीपातळी उतरली.
वारणा धरणातूनही विसर्गही निम्म्याने कमी करण्यात आला आहे. तो 14 हजार 212 करण्यात आला आहे. आला. कण्हेर धरणातून केवळ 64 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धोम धरणांतून फक्त 3444 क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिह्यातही कमी अधीक प्रमाणात पाऊस सुरू होता.
जिह्यातील कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यावर परिणाम करणाऱया कोयना, वारणा, धोम आणि कण्हेर या चारही धरणातील पाणीसाठा गेल्या 13 दिवसांपासून झपाटय़ाने वाढला होता पण या धरणांतून विसर्ग करण्यात आल्याने ही धरणे आता 90 टक्क्यावरून ती कमी होऊन 85 टक्केवर आली आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 दिवसापासून कोयनेतून आणि नऊ दिवसापासून वारणेतून आणि आता सहा दिवसापासून कण्हेर धरणातून तर तीन दिवसांपासून धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कराड याठिकाणी आता पाणी तीन फूटाने उतरले आहे. सांगलीत कृष्णा नदीची पातळी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्थिर होती सायंकाळी 37 फूटावरच होती. जिह्यात सातत्याने पावसाची रिपरिप पुर्णपणे थांबली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पावसाच्या पाण्याची होणारी वाढ ही थांबली आहे. रविवारी ती 35 फुटावर जाणार आहे. त्यामुळे शहरातील जामवाडी या भागातील पाणी ओसरणार आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट याठिकाणी पाणी शिरल्याने 45 कुंटुंबाचे स्थालंतर झाले आहे. या कुंटुंबाना महापालिकेच्या शाळा नंबर 25 व शाळा नंबर एक याठिकाणी ठेवण्यात आले आहे.
वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वारणेला पूर आला आहे. भरतवाडी, कणेगाव याठिकाणचा संपर्क तुटला आहे. वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने विसर्ग निम्याने कमी केला आहे. तो आता 8 हजार विसर्ग सुरू ठेवण्यात आल्याने वारणेची पाणीपातळी झपाटय़ाने उतरणार आहे. शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे. शिराळा तालुक्याबरोबरच वारणा वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या शेतीत पसरले आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पाणीपातळी मात्र वाढली आहे आणि येथे वारणेच्या पाण्याच्या वेगामुळे कृष्णेचे पाणी थोपले जात असल्याने कृष्णेची आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी उतरण्यास अडचण येत आहे.
कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी केला
कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने याठिकाणाहून विसर्गही कमी करण्यात आला आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण् तो फक्त 54 हजार इतकाच आता तोही विसर्ग रविवारी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कोयना धरणांतील पाणीपातळी कमी झाल्याने ते पुर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
कृष्णा नदीतून आयर्विन पुलाजवळून सेकंदाला 88 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, तोच अंकली पुलाजवळ एक लाख 25 क्युसेसने सुरू झाला आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम झाल्याने कृष्णेची पाणीपातळी एकदम दुप्पट होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अंकलीजवळून सव्वा लाखाने विसर्ग होत आहे. कृष्णा आणि वारणेतील हे पाणी तातडीने पुढे सरकण्यासाठी अलमट्टी धरणांतून विसर्ग वाढविण्याचे आदेश देण्यात आल्या आहेत.आणि अलमट्टीमधून दोन लाख 54 हजारने विसर्ग शनिवारी सुरू ठेवला आहे.
अलमट्टीमधून दोन लाख 54 हजार क्युसेस विसर्ग सुरू
वारणा आणि कृष्णेतील पाणीपातळी स्थिर राहण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्गही त्या प्रमाणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणाहून आता सेकंदाला दोन लाख 54 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात पाणी दोन लाख 25 हजार क्युसेस येत आहे त्यामुळे अलमट्टी धरणांची उंची 517.60 इतकी स्थिर ठेवण्यात येत आहे. अलमट्टीमधून दुप्पट वेगाने पाणी सोडल्याने पाण्याची पातळी स्थिर रहात आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी कोयना येथे 53, महाबळेश्वर येथे 51, आणि नवजा येथे 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात एकूण 86.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे धरण 82 टक्के भरले आहे. तर वारणा धरणात 29.26 इतका पाणीसाठा झाला आहे हे धरण 85 टक्के भरले आहे. धोम धरणात 10.77 टीएमसी आणि कण्हेर धरणात 8.42 इतका पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणातून तीन हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
या चारही धरणातील पाणीपातळी आता स्थिर झाली आहे. कृष्णा आणि वारणेचीही पाणीपातळी कमी होत आहे. बहे याठिकाणी कृष्णेची पाणीपातळी 12 फूट झाली होती ताकारी येथे 42 फूट 6 इंच झाली होती. भिलवडीत 41 फूट 6 इंच इतकी होती आयर्विन पुलाजवळ सकाळी ती 38 फूट सहा इंच होती ती सायंकाळी 38 फुट गेली. आणि अंकली येथे 43 फूटावर गेली आहे.
जिह्यात इस्लामपूर येथे 5 मि.मी., पलूस येथे 2, तासगाव येथे 5, सांगली येथे 2, शिराळा येथे 11, मिरज येथे 00, विटा येथे 6, आटपाडी येथे 0, कवठेमहांकाळ येथे 2, जत येथे 6 आणि कडेगाव येथे 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कृष्णेची पाणीपातळी
बहे- 12 फूट,
ताकारी - 42 फूट 8 इंच
भिलवडी - 41 फूट सहा इंच
आयर्विन - 38 फूट
अंकली - 42 फूट 4 इंच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा