राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामामध्ये सर्वोदय सहकारी साखर कारखान्यात पाच लाख मेट्रीक टन उसाचे गाळप निश्चितपणे करेल, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बांधकाम समितीचे सभापती विराजदादा शिंदे यांनी व्यक्त केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवित असलेल्या कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन समारंभ प्रसंगी शिंदे बोलत होते. प्रारंभी शिंदे यांच्या हस्ते धार्मिक विधीने रोलर पूजन करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री संपतराव पाटील, भगवान पाटील, रमेश हाके, दिनकर पाटील, जानकास ढोले, कमल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रोलर पूजन करण्यात आले.
शिंदे पुढे म्हणाले, या गळीत हंगामासाठी शेतकऱयांच्याकडून उसाची नोंद चांगली झाली आहे. तसेच उस तोडणी व वहातूक करार करण्यात आले आहेत. ऑफ सिझनमधील करावयाची कामे गतीने सुरू आहेत. उस उत्पादक सभासद व शेतकऱयांच्या सहकार्याने आम्ही या युनिटमध्ये यशस्वीपणे पाच लाख मेटीक टनाचे गाळप करू. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक श्रेणीक कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी आभार मानले. याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री एल. बी. माळी, मेघा पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे, कामगार युनियन अध्यक्ष तानाजी खराडे, कामगार संचालक मोहनराव शिंदे, राजेंद्र चव्हाण, आष्टयाचे कार्यकर्ते रघुनाथ जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वोदय चिफ इंजिनिअर विजय मोरे, चिफ केमिस्ट उमेश शेटे, सुशिल भंडारे, बाबासो चौगुले, विजय पाटील, सुधाकर पाटील, बाबासो चौगुले व त्याच्या सहकाऱयांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
बुधवार, २४ जुलै, २०१३
‘सर्वोदय’ पाच लाख टन गाळप करेल- शिंदे
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामामध्ये सर्वोदय सहकारी साखर कारखान्यात पाच लाख मेट्रीक टन उसाचे गाळप निश्चितपणे करेल, असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बांधकाम समितीचे सभापती विराजदादा शिंदे यांनी व्यक्त केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालवित असलेल्या कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन समारंभ प्रसंगी शिंदे बोलत होते. प्रारंभी शिंदे यांच्या हस्ते धार्मिक विधीने रोलर पूजन करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री संपतराव पाटील, भगवान पाटील, रमेश हाके, दिनकर पाटील, जानकास ढोले, कमल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रोलर पूजन करण्यात आले.
शिंदे पुढे म्हणाले, या गळीत हंगामासाठी शेतकऱयांच्याकडून उसाची नोंद चांगली झाली आहे. तसेच उस तोडणी व वहातूक करार करण्यात आले आहेत. ऑफ सिझनमधील करावयाची कामे गतीने सुरू आहेत. उस उत्पादक सभासद व शेतकऱयांच्या सहकार्याने आम्ही या युनिटमध्ये यशस्वीपणे पाच लाख मेटीक टनाचे गाळप करू. राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक श्रेणीक कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी आभार मानले. याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री एल. बी. माळी, मेघा पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे, कामगार युनियन अध्यक्ष तानाजी खराडे, कामगार संचालक मोहनराव शिंदे, राजेंद्र चव्हाण, आष्टयाचे कार्यकर्ते रघुनाथ जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वोदय चिफ इंजिनिअर विजय मोरे, चिफ केमिस्ट उमेश शेटे, सुशिल भंडारे, बाबासो चौगुले, विजय पाटील, सुधाकर पाटील, बाबासो चौगुले व त्याच्या सहकाऱयांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा