




उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सांगलीसह राज्यातील 16 जिह्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे 200 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून जसजसे प्रस्ताव येतील तसतसे आपण विकासासाठी निधी देणार आहे, अशी माहिती या महामंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री मदन पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शनिवारी सांगलीत विजय बंगल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक अशी तीन महामंडळे आहेत. यापैकी उर्वरित महाराष्ट्र वैधानिककडे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील 16 जिह्यांचा समावेश आहे. रस्ते, समाज मंदिरे, छोटय़ा पाणी योजना आदी विकासकामे या महामंडळाकडून करता येतात. हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे थेट राज्यापालांकडून या महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला जातो. आतापर्यंत या महामंडळाला 100 कोटीचा निधी होता. पण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता या महामंडळासाठी 200क् ाढाsटीचा निधी देण्याची ग्वाही दिली आहे. गेली दोन वर्षे या महामंडळाला अध्यक्षच नसल्याने या महामंडळाचा कार्यभार कोकण विभागीय आयुक्तांकडे होता. त्यामुळे या महामंडळाबाबत बंद पडलेले महामंडळ म्हणुन टीका होत होती. पण, आता 200 कोटीच्या निधीतून अनेक विकासकामे शक्य आहेत.
आपल्याकडे जसजसे प्रस्ताव येतील त्याप्रमाणे आपण निधी उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील सर्वात मोठे हे महामंडळ आहे. रस्ते, समाजमंदिरे तसेच ठाणे, धुळे व नंदुरबार या जिह्यातील कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी आपण निधी देणार आहे. या महामंडळाला आता निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी विजय बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते शरद पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर किशोर शहा, किशोर
जामदार, विजय धुळबुळू, माजी उपमहापौर किरण जगदाळे, सुरेश आवटी, गौरव नायकवडी, शरद शहा, नगरसेवक हणमंत पवार, लक्ष्मण नवलाई, राजेश नाईक, प्रशांत पायगोंडा
पाटील, प्रशांत पाटील मजलेकर, शिवाजी डोंगरे, मयुरशेठ पाटील, रावसाहेब पाटील, नगरसेवक हारूण शिकलगार, नरसगोंडा पाटील, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बापूसाहेब पाटील, बिल्डर के. के. शहा, पानपट्टी असो.चे अजित सूर्यवंशी, अकबरभोजाणी, गजानन मगदूम, सुधीर पाटील, विजय पवार, अशोक पवार, उत्तम साखळकर, नगरसेवक आसिफ बावा, उमेश पाटील, नंदकुमार देशमुख, अमर निंबाळकर, अतुल माने यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नूतन नगरसेवक, पदाधिकारी, विविध शिक्षण
संस्थांचे पदाधिकारी, अनेक तालुक्यातील नेते मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा