बुधवार, १७ जुलै, २०१३

चार हजार रुपये प्रति महिना भरून तुम्हीही होवू शकता कोट्यधीश...!

अमेरिकन डॉलरकडून भारतीय रुपयाची यथेच्छ धुलाई सुरु असताना देशातील सर्वसामान्य जनता महागाईने बेजार झाली आहे. आवकपेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे बहुतेकांच्या घरातील बजेट कोलमडले आहे. याचा विपरीत परिणाम त्यांच्या बचतीवर होताना दिसत आहे. परंतु, बचतीचे योग्य नियोजन असेल तर सर्वसामान्य नागरिकही अल्पवधीत 'कोट्यधीश' होऊ शकतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना, मात्र हे खरं आहे. 'मी कोट्यधीश झालो तर' असे प्रत्येकाला स्वप्न पडत असते. जर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले आणि योग्य नियोजन करून बचत केली तर कोट्यधीश बनणे आता काहीच कठीण गोष्ट राहिलेले नाही. प्रति महिना चार हजारांहून थोडे जास्त रुपये अर्थात वर्षाला 50 हजार रुपये बचत करावी. 12 टक्के व्याज दराने 25 वर्षांत ही रक्कम एक कोटी रूपयांच्या घरात जाते. याजदराची भूमिका महत्त्वाची... तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळते आणि त्यामुळेच तुमची रक्कम वाढत जाते. व्याजदर जसा वाढेल तशी तुमची रक्कम वाढत जाईल. व्याजदर वाढल्यामुळे तुम्ही अल्पवधीत करोडपती बनू शकता. बचतीवर वेगवेगळा व्याजदर दिला जातो. उदाहरण द्यायचे झालेच तर शेअर बाजारातील गुंतवणुकीवर 15 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. परंतु, या गुंतयवणुकीत खूप जोखिम स्विकारावी लागत असते. बॅंकेत गुंतवणूक केल्यास 8-9 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. मात्र, ही गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित असते. त्यामुळे बहुतेक लोक बॅंकेतच गुंतवणूक करतात. 'करोडपती' बनण्याचे लक्ष्‍य प्राप्त करण्यासाठी 'शॉर्टकट' धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे जोखिम नसेल असाच पर्याय आपण निवडला पाहिजे. एक यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक असते. अर्थात शेअर बाजार, बॉन्‍ड, रिअल इस्‍टेटमध्ये रुपये गुंतवले पाहिजे. 11 टक्के व्याजदरावर प्रतिवर्षी 100 रुपये गुंतवले तर 25 वर्षांनंतर मुद्‍दल रकमेवर 1359 रुपये व्याज मिळते. अशा पद्धतीने 15 टक्के व्याजदराने एका वर्षात 100 रुपये गुंतवले ती 25 वर्षांनंतर जमा रकमेवर 3292 रुपये व्याज मिळेल. योग्य कालावधीसाठी गुंतवणूक... चांगला मोबदला मिळण्यासाठी योग्य कालावधीची निवड महत्त्वाची असते. 19 ते 26 वयोगातील व्यक्तींनी प्रतिवर्ष दोन हजार रुपये गुंतणूक केल्यास वयाच्या 65 वर्षी 1,019,161 रूपये तर 27 ते 65 वयोगाटातील व्यक्तींना 805,185 रुपये मिळतात. रुपया घसरला तरी 'नो टेन्शन' सध्या भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने देशातील जनता बेजार झाली आहे. अमेरिकी अर्थव्‍यवस्‍था भक्कम होत असून भारतीय बाजाराला त्याचा फटका बसत आहे. अशा स्थितीत नुकसानासोबत फायदाही होत असल्याचे नाकारता येणार नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या याचा फायदा उचलताना दिसत आहे, तर टेलीकॉम, ऑटोमोबाइल्‍स, एफएमसीजी, पेट्रोलियम आणि वीज निर्मिती क्षेत्राला फटका बसत आहे. अशा परिस्थितीत योग्य क्षेत्राची निवड करून त्यात गुंतवणूक केली पाहिजे. रुपया सातत्याने घसरत असताने गुंतवणुकीतील जोखीम वाढली आहे. यावेळी जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे. सोने खरेदीतील गुंतवणूक कधीही उत्तम सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यामुळे बहुतेक लोक सोने खरेदी करतात. अमेरिकी अर्थव्‍यवस्‍थेत सुधारणा झाल्याने डिसेंबर 2012 पासून सोन्याच्या किंमतील कमालीची घसरण दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आगामी काळात सोन्याच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे भविष्यात फायदेशिर होऊ शकते. ठरविक बचतीसाठी गुंतवणूक एफआयआयच्या जोरावर भारतीय शेअर बाजार गेल्या महिन्यात तेजीत होता. परंतु रुपयाच्या घसरणीचा परिणाम बाजारावर होत आहे. रुपया घसरल्याने महागाई सातत्याने वाढ होत आहे. परिणामी भारतीय रिझर्व बॅंक पुन्हा एकदा व्याजदर वाढीचीही घोषणा करू शकते. या परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मोह टाळला पाहिजे. तुम्ही काय करू शकता?: जोखीम न स्विकारता बँकेत गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता. याशिवार जास्त कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. परंतु कोणताही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा