बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

‘कवठेपिरान’ देशाचे लक्ष वेधणार

@ सांगली / प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेपिरान ता. मिरज येथील ग्रामस्थांनी आता नव्याने या अभियानात सहभाग घेऊन देशातील एक आदर्श ‘रोल मॉडेल’ गांव बनविण्याचा चंग बांधला आहे. याची सुरूवात गुरूवारी दहा हजार वृक्षलागवड करून करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आदर्श सरपंच पै. भीमराव माने यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. सद्याचे गृहमंत्री आणि संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियानांचे जनक आर. आर. पाटील यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. या अवाहनास प्रतिसाद देताना आपल्या सरपंच पदाच्या कार्यकालात आम्ही हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. आणि तो तडीसही नेला. याचे चांगले फळ आम्हाला मिळाले. 2003-04 या साली गावाला ग्रामस्वच्छता अभियानाती राज्यातील पहिले बक्षिस प्राप्त झाले. तर आपणाला आदर्श संरपंचाचा पुरस्कार देऊन शासनाने गौरविले. गावाला ग्रामस्वच्छता अभियानांची आवड आहे. पून्हा एकदा गावाने हे अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदाची धुरा गावातील महिलांनी सौ. अनिता माने यांच्याकडे सोपविली आहे. गावातील महिलांनीच हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याची सुरूवात गुरूवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते 10 हजार वृक्षलागव करून करण्यात येणार आहे. या वृक्षलागवडीत गावातील 700 महिला सहभागी होणार आहेत. या शिवाय पुढील आठवडय़ात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित अभियानाची जनजागृती आणि व्यसनमुक्तीसाठी मशाल मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूक गावातील दोन हजार महिला सहभागी होणार असल्याचेही भीमराव माने यांनी स्पष्ट केले. अभियान यशस्वी करण्यासाठी गावातील महिला आपपाल्या वार्डातील गटारी स्वता स्वच्छ करीत आहेत. या शिवाय महिलांनीच गावात प्लॅस्टीक बंदी केली आहे. गावातील सुमारे दोन हजार महिलांनी प्रत्येकी पाच रोपे लावून ती जगविण्याची जबाबदारी घेतली आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी गावात काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. गावात गुटखा आणि मावा विक्री पूर्णत बंद करण्यात आली आहे. ग्रामस्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षा सौ. अनिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावात बालसंसार वर्ग सुरू करण्यात आला असून यामध्ये 300 शालेयविद्यार्थी सहभाग घेतला असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून गावातील संपूर्ण गावातील गल्ली बोळातील रस्ते पेव्हींग ब्लॉकने करण्यात येणार आहेत. सद्या 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम येत्या काही महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यापैकी दलीतवस्ती सुधार योजनेतून करण्यात येत असलेल्या पेव्हींग ब्लॉकच्या कामाचे उद्घाटनही डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात येणार आहे. गावात बचत गटांची संख्या चांगली आहे. आता शासन आदेशानुसार या बचत गटांचा महासंघ करून बचत गटांना उद्योग उभे करून देण्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न करणार असल्याचेही माने यांनी सांगितले. अभियानांतर्गत गावातील प्रत्येक घर पून्हा एकाच रंगाने रंगविण्यात येणार आहे. तर प्रत्येक गल्ली बोळात वेलीचे मंडप उभे करण्यात येणार आहेत. जकार्तावीर हिंदकेसरी मारूती माने यांचे गावात स्मारक पूर्ण होत नाही तोपर्यत आणि गावात 102 कोटी रूपयाची विकास कामे मार्गी लागत नाही तोपर्यत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय आपण हिंदकेसरी मारूती माने यांच्या पुण्यतिथी दिनी घेतला आहे. ग्रामस्वच्छता अभियानास ग्रामस्थांच्यामधून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या स्पर्धेत राज्याचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच संपूर्ण देशात एक ‘रोल मॉडेल’ गाव बनविण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचेही पै. भीमराव माने यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा